Ad will apear here
Next
‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ क्षेत्रातील जागतिक संशोधन स्पर्धेत पुणेकर आनंद ललवाणी यांना यश
सर्वोत्तम संशोधनासाठी सांघिक एक लाख डॉलरचे बक्षीस
आनंद ललवाणीपुणे : ‘आयओटी’ अर्थात ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ क्षेत्रातील नावीन्यपूर्ण संशोधनाद्वारे मानवी समस्यांवर उत्तर शोधण्यासाठी घेण्यात आलेल्या जागतिक स्पर्धेत पुण्यातील आनंद ललवाणी यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. 

‘कीसाइट टेक्नॉलॉजीज’तर्फे आयोजित ‘कीसाइट आयओटी इनोव्हेशन चॅलेंज’ नावाच्या या स्पर्धेत आनंद यांच्या संघाने सर्वोत्तम संशोधनासाठीचे एकूण तब्बल एक लाख डॉलरचे पारितोषिक पटकावले आहे.

आनंद ललवाणी हे सध्या कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापीठात पीएचडीचे अध्ययन करीत असून, या स्पर्धेसाठीच्या त्यांच्या संघात मॅक्स हॉलिडे या विद्यार्थ्याचाही समावेश होता.

पाण्यात बुडवून ठेवण्याजोग्या आयओटी सेन्सर्सद्वारे दुरूनही पाण्याच्या गुणवत्तेवर कसे लक्ष ठेवता येईल, हा आनंद यांच्या संघाच्या सादरीकरणाचा विषय होता. त्यासाठी त्यांना पन्नास हजार डॉलरचे रोख बक्षीस  प्रदान करण्यात आले, तसेच त्यांच्या विद्यापीठास पन्नास हजार  डॉलर मूल्याची ‘कीसाइट’ निर्मित चाचणी उपकरणे देण्यात आली. पाण्याच्या प्रदूषणावर या उपकरणामुळे एक सक्षम उपाय शोधला गेला आहे.

आनंद ललवाणी म्हणाले, ‘या स्पर्धेमुळे विद्यार्थी म्हणून मी करत असलेल्या संशोधनास नवी दिशा मिळाली आहे. ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ या क्षेत्राच्या व्याप्तीची आणखी चांगली माहिती आम्हाला झाली आणि त्यामुळे आमच्या विचारांना चालनाच मिळाली.’

या वर्षी या स्पर्धेत नावीन्यपूर्ण संशोधनाच्या ३०० कल्पना मांडण्यात आल्या होत्या. अमेरिका, फ्रान्स, मलेशिया, इंडोनेशिया, न्यूझीलंड आणि भारतातील स्पर्धकांनी त्यात भाग घेतला होता.    

(‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ या क्षेत्राची माहिती देणारे ‘इंटरनेट – यत्र, तत्र, सर्वत्र’ हे सदर दर १५ दिवसांनी, गुरुवारी बाइट्स ऑफ इंडियावर  प्रसिद्ध होते. त्या सदरातील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZWDCF
Similar Posts
जागतिक बाजारपेठेतील सॉफ्टवेअर उत्पादनांचा भारताचा वाटा आठ बिलियन डॉलर्सचा पुणे : ‘सॉफ्टवेअर उत्पादनांचा जागतिक बाजार ५०० बिलियन डॉलरचा असून, त्यातील भारताचा वाटा जवळपास आठ बिलियन डॉलर्सचा आहे. येत्या २०२५ पर्यंत तो ७० ते ८० बिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे. ते साध्य करण्यासाठी सरकार, विविध मंत्रालये व व्यवसायातील तज्ज्ञांकडून एकत्र येऊन पोषक वातावरण तयार करण्याच प्रयत्न
दुष्काळी कामखेड्यात साठणार तीन कोटी लिटर पाणी पुणे : कामखेडा हे बीड जिल्ह्यामधील दुष्काळी गाव; पण यंदाचा पाऊस पडल्यावर या गावात तब्बल तीन कोटी १५ लाख लिटर पाणी साठवले जाईल. कारण गावातील सर्वच्या सर्व म्हणजे ६५८ घरांच्या छतांवर पडणारे पावसाचे पाणी वाहून न जाता साठवले जाणार आहे. ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अर्थात पर्जन्यजलसंचयाचा असा समग्र प्रकल्प राबविणारे हे पहिले गाव ठरले आहे
आंतरराष्ट्रीय विज्ञानपट महोत्सवात पुणेकर ‘कस्तुरी’च्या यशाचा दरवळ पुणे : दहावीत शिकणाऱ्या कस्तुरी कुलकर्णीने बनवलेल्या ‘सिंबायोसिस’ या लघुपटाला ‘इंटरनॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’मध्ये तृतीय पुरस्कार मिळाला आहे. कस्तुरी ‘बेरीज वजाबाकी’ या मराठी चित्रपटाची सहाय्यक दिग्दर्शकसुद्धा आहे.
अझर गोट्या इलेव्हन संघाने जिंकला स्वच्छता करंडक पुणे : पुणेकरांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने माय अर्थ फांउडेशन आणि पुणे महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता करंडक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अझर गोट्या इलेव्हन या क्रिकेट संघाने हा ‘स्वच्छता करंडक’ जिंकला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language